My village essays in Marathi: खेडेगाव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौंदर्य शहरातील धावपळीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधी चांगले असते.
जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेला असतो नंतरच्या काळात नोकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्य करावे लागते परंतु तरी तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून हा लेखात आम्ही आपल्यासाठी(maze khedegaon nibandh) माझे खेडेगाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध आपल्या मित्रासोबत शेअर करा.
माझे खेडेगाव मराठी निबंध/my village essays in Marathi
मी व माझे आई-वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील खामखेडा आहे .माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे.गावात माझे आजी आजोबा शेती करतात तिथे त्यांचे घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते माझ्या गावाच्या चारही चारी बाजूंना हिरवी शेती आहे.याशिवाय आणि हिरवी झाडी झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकामेका सोबत मिळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपाल आहे.
माझ्या खेडेगावात एक मोठी नदी आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दुपारी मी या नदीत अंघोळीला जातो नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे. या मंदिराच्या ओटावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. याशिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळ खेळताना दिसतात.माझ्या गावात एक शाळा देखील आहे. पण तेथे फक्त पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे पुढील शिक्षणासाठी मुळे जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात.
माझ्या गावात प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते.भगवान शंकराच्या दर्शनासाठी दुरून दुरन लोक येतात या दरम्यान गावात कपडे, दागिने ,आणि खेळणीची मोठी मोठी दुकाने लागलेली असतात.म्हणून आजोबांच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळी मैदान आहेत.
येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात गावात खूप कमी प्रमाणात वाहने चालताना दिसतात म्हणून येथे पृथ्वी प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे .मला शेतामध्ये जाऊन बसायला खूप आवडते माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवेमुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायू आहेत.
खेडेगाव म्हटले की, सगळ्यांना आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात. जरी आपण शहर गावी राहायला आलो तरी खेडेगाव विसरू शकत नाही. कारण आपण खेडेगावातील आपली आई, वडील, आजोबा आपले जुने मित्र हे कधीच विसरू शकत नाही. खेडेगावाचा प्रसंग जुन्या आठवणी आपल्याला जाग्या करून देतात.
आपण ज्या गावांमध्ये जन्माला आलो ते गाव कधीच विसरू नका. कारण आपण ज्या गावांमध्ये लहानाची मोठी झालो शेगाव कधी विसरू नका, कारण त्या गावांमध्ये आपला जन्म झालेला असतो.जरी आपण शहरात राहायला आलो असलो तरी, आपली जुनी गाव म्हणजेच आपली जन्मभूमी विसरू नका. खेडेगावात जुन्या परंपरा, चालीरीती रूढ परंपरा व आपले सण समारंभ हे कधीच विसरायचे नसते.
खेडेगावात अजूनही आपण भंडारा होत असतो. त्या भंडाऱ्याची आजही आठवण आली तर, वरण मिरची ठेचा अशी अनेक पंचपक्वान तयार करतात . ही खाण्याची खेडेगावातील भंडार्यात नवीन पद्धत निर्माण झाली होती.
म्हणून मला माझे खेडेगाव जास्त नेहमी आवडते.
माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते ही मातीची आहे. माझी इच्छा आहे की ही मोठी झाल्यावर ,इंजिनियर म्हणून गावाची रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करेल मला माझे गाव खूप आवडते माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गावात सर्वात सुंदर आहे.
मित्रांनो माझे खेडेगाव हा निबंध आपण शालेय जीवनात नेहमी वापरू शकता. तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कळवायला विसरू नका.
my village essays in Marathi .
Very nice
उत्तर द्याहटवा